महिलांचे अधिकार आणि सन्मान यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार ! – डॉ. भारती चव्हाण, अध्यक्षा, मानिनी फाऊंडेशन

पत्रकार परिषदेत माहिती देतांना डॉ. भारती चव्हाण (डावीकडून चौथ्या) आणि अन्य पदाधिकारी 

कोल्हापूर, २१ मे (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी महिला बालकल्याण विभागासाठी २५ सहस्र ४४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराविषयी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. यापुढील काळात महिलांचे अधिकार आणि सन्मान यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार आहे, अशी माहिती ‘मानिनी फाऊंडेशन’च्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी भारती चव्हाण, अश्विनी जाधव, स्वाती शहा, वैशाली महाडिक यांसह अन्य उपस्थित होत्या.

१. देशाच्या विकासात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भारतीय संस्कृतीत मातेचा ‘मातृदेवो भव’ म्हणून सन्मान केला जातो. तरी समाजाने तिला योग्य स्थान देऊन तिचा आदर केला पाहिजे.

२. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘मानिनी फाऊंडेशन’ कार्यरत आहे. महिलांना आर्थिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. विशेष करून शेतकरी आणि शेतमजुर महिलांच्या उन्नतीसाठी शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतात.