महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी आणावी ! – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची हिंदुद्वेषी सूचना

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

बेळगाव – भाजपने धार्मिक मूलतत्त्ववाद आणि आतंकवाद यांच्या विरोधात लढण्यासाठी स्वतंत्र पोलीस शाखा स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. याचा अर्थ काय होतो ? हे त्यांना विचारा. (एका राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या अशोक चव्हाण यांना जर आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी स्वतंत्र पोलीस शाखा काय कार्य करते ? हे माहिती नसेल, तर ते आश्चर्यकारक आहे ! – संपादक) कायदा आणि राज्यघटना यांच्यापुढे कुणीही मोठे नाही. त्यामुळे बजरंग दल, ‘पी.एफ्.आय.’ आणि इतर कोणत्याही संघटना यांना शत्रुत्व-द्वेष यांचा प्रसार करू देता कामा नये. आम्ही अशा संस्थांवर बंदी घालण्यासाठी निर्णायक कायदेशीर कारवाई करू. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही बजरंग  दलावर बंदी घालावी, अशी हिंदुद्वेषी सूचना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ते बेळगाव येथे प्रचारासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. (केवळ हिंदुद्वेषापोटीच आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठीच अशोक चव्हाण बजरंग दलावर बंदीची मागणी करत आहेत ! अशोक चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात इस्लामी धार्मिक कट्टरतावाद पसरवणार्‍या संघटनांवर बंदी आणण्यासाठी काय प्रयत्न केले ? हेही स्पष्ट करावे ! आदर्श सोसायटी घोटाळ्याचा आरोप असणार्‍या आणि त्यासाठी पदावरून पायउतार व्हावे लागलेल्या अशोक चव्हाण यांनी अशा सूचना करणे हास्यास्पद आहे ! – संपादक)