सरकारी सेवेत रुजू झाल्यावर प्रलोभनांना बळी पडू नका ! – अजित पवार

सरकारी सेवेमध्ये लागल्यानंतर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य काम करावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती मध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना दिला.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना करातून मिळाले ११५ कोटी रुपयांचे उत्पन्न !

ग्रामपंचायती वार्षिक कर आकारणी करतात. मार्च मासाच्या शेवटी हा कर ग्रामपंचायतीमध्ये भरावा लागतो. यासाठी विशेष करवसुली मोहीम राबवून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे लांजा येथे तरुणांना आवाहन

पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘प्रत्येक हिंदु तरुणांनी पुढील २ वर्षे राष्ट्रासाठी झटून कष्ट केले पाहिजेत. गावागावांत, घराघरांत जाऊन आपला हिंदु धर्म कसा श्रेष्ठ आहे ? भारतभूमी कशी श्रेष्ठ ? आहे, याविषयी सांगितले पाहिजे.’’

देशातील पहिल्या ‘हॅम रेडिओ’ आधारित पूरप्रवण गावांसाठी बिनतारी संदेश यंत्रणेचे कोल्हापूर येथे उद्घाटन ! 

भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ‘हॅम’ वापरणार्‍यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ही संख्या वाढल्यास संभाव्य आपत्तीच्या प्रसंगी आपण ‘हॅम’ यंत्रणेचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचवू शकतो.

भुवन (जिल्‍हा नाशिक) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अत्‍याचार झाल्‍याचे ८ दिवसांनी भावाला समजले !

सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही प्रशासन या प्रकरणातील दोषींना अटक करण्‍याची कठोर कारवाई का करत नाही ? विधान परिषदेच्‍या उपसभापतींना असे निवेदन देऊन ‘दोेषींवर कारवाई करा’, असे सांगावे लागते, हे प्रशासकीय अधिकार्‍यांना लज्‍जास्‍पद आहे.

भारताला समृद्ध करणारे मेहनती लोक महाराष्ट्राला लाभले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

विदर्भ आणि मराठवाडा येथे गारपिटीची शक्‍यता

महाराष्‍ट्रात मागच्‍या काही दिवसांपासून पाऊस थैमान घालत आहे. दरम्‍यान सध्‍या पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्‍याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बेळगाव जिल्‍ह्यातील (कर्नाटक) सौंदत्ती तालुक्‍यात निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर १ सहस्र ६०० कुकर जप्‍त !

बेळगाव जिल्‍ह्यातील सौंदत्ती तालुक्‍यातील तेग्‍गीहाळ गावात शेतातील शेडमध्‍ये मतदारांना वाटण्‍यासाठी अवैधरित्‍या साठवून ठेवण्‍यात आलेले १ सहस्र ६०० कुकर पोलिसांनी जप्‍त केले आहेत.

सध्‍या कोल्‍हापूर जिल्‍ह्यात पाणीटंचाई नाही; मात्र टंचाई आराखडा सिद्ध ! – निवासी उपजिल्‍हाधिकारी

गत पावसाळ्‍यात कोल्‍हापूर जिल्‍ह्यात चांगला पाऊस झाल्‍याने जिल्‍ह्यातील धरणे बर्‍यापैकी भरलेली आहेत. उन्‍हाळ्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर मेमध्‍ये सध्‍यातरी जिल्‍ह्यात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई नाही; मात्र त्‍या स्‍थितीतही कुठे टंचाई जाणवल्‍यास आम्‍ही आराखडा सिद्ध केला आहे.