मुंबई – महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून पाऊस थैमान घालत आहे. दरम्यान सध्या पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे.
२३ एप्रिलपासून विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, तसेच गारपीट होत असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला होता तो कायम आहे. सतत होत असलेला पाऊस आणि गारपीट यांमुळे राज्यातील तापमान ३८ अंशांपर्यंत आले आहे.
मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, तर मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.