
बेळगाव – बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील तेग्गीहाळ गावात शेतातील शेडमध्ये मतदारांना वाटण्यासाठी अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेले १ सहस्र ६०० कुकर पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी सौंदत्ती पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे कुकर कुणी आणून ठेवले होते ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. कर्नाटक विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने अनेक उमेदवार मतदारांना त्यांच्याकडे वळवण्यासाठी विविध भेटवस्तू देत आहेत, त्यातलाच हा प्रकार असल्याची चर्चा असून पोलीस या प्रकाराचे अधिक अन्वेषण करत आहेत.
याचसमवेत सीमावर्ती भागात रामदुर्ग पोलिसांनी एका गाडीत असणारी १ कोटी ५४ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी संबंधित कारचालकाला कह्यात घेतले असून याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे.
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी