ठार झालेला नक्षलवादी महाराष्ट्रदिनी घातपाताच्या सिद्धतेत होता !
गडचिरोली – येथील भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षलवादी यांच्यातील चकमकीत ‘पेरमीली दलम’ संघटनेचा कमांडर कुख्यात नक्षलवादी बिटलू मडावीसह ३ नक्षलवादी ठार झाले. गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाने ही कारवाई केली.
गडचिरोलीमध्ये पोलिसांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला#Gadchiroli #Naxal #Maharashtra #MaharashtraNews https://t.co/DW2VlgUUyC
— ABP माझा (@abpmajhatv) April 30, 2023
बीटलू मडावी हा महाराष्ट्रदिनी मोठ्या घातपाताच्या सिद्धतेत असल्याचे समजते. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ जहाल नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये डीव्हीसी वासू आणि ‘अहेरी दलम’चा सदस्य श्रीकांत यांचाही समावेश आहे.