डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडून अधिकार्यांची कानउघाडणी !
नाशिक – जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील भुवन येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आश्रमशाळा अधीक्षकासह महिला अधीक्षकास निलंबित करण्यात आले होते. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली असून अत्याचार झाल्यानंतर पीडितेच्या भावाला ८ दिवसांनंतर समजले होते. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी अधिकार्यांची कानउघाडणी केली आहे.
*भुवन,जि.नाशिक आश्रमशाळेत मुलीवर लैगिंक अत्याचार करणार्यासह घटना लपविणार्यांवर कारवाई करा
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी@MahaDGIPR @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @SakalMediaNews @mataonline @lokmat @LoksattaLive @ANI
-2 pic.twitter.com/VUaQZ49joN— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) April 27, 2023
या संदर्भात चौकशी करण्यात येऊन आश्रमशाळेचे अधीक्षक राहुल तायडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याचसमवेत महिला अधीक्षकांचेही निलंबन करण्यात आले होते. आता उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे. त्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकासर्व यंत्रणा हाताशी असतांनाही प्रशासन या प्रकरणातील दोषींना अटक करण्याची कठोर कारवाई का करत नाही ? विधान परिषदेच्या उपसभापतींना असे निवेदन देऊन ‘दोेषींवर कारवाई करा’, असे सांगावे लागते, हे प्रशासकीय अधिकार्यांना लज्जास्पद आहे. पोलीस झोपले आहेत का ? त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात कसे येत नाही ? या प्रकरणात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आश्रमाचे अधीक्षक यांची भूमिका संशयास्पद असून या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. |