उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने !

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – उंचगाव येथे कष्टकरी, सर्वसामान्य कुटुंबातील, तसेच मजुरी करणार्‍यांची संख्या अधिक आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांनाही उंचगावमधील वीज वितरण शाखेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी मार्चचे कारण सांगून वीजवसुली करतांना त्यांची वीज बंद करत होते. देयक दिल्यावर केवळ २ – ३ दिवसांत वीजदेयक भरण्याची सक्ती केली जात होती, तरी या संदर्भात उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर ठाकरे गटाने निदर्शने करून संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला. करवीर ठाकरे गटाच्या वतीने मागण्यांचे निवेदन उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबेकर यांना देण्यात आले.

या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, विक्रम चौगुले, दीपक पाटील, हिंदुत्वनिष्ठ शरद माळी, राहुल गिरूले, फेरीवाला संघटनेचे कैलास जाधव यांसह अन्य उपस्थित होते.