पाक सरकारकडून विजेवरील अनुदान रहित करण्याचा निर्णय

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटीशर्ती मान्य करण्यास नकार दिल्याने पाकला नाणेनिधीकडून कोणतेही कर्ज मिळू शकलेले नाही; मात्र आता पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या अटीशर्तींपैकी एक असणारी विजेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्याची अट पूर्ण केली आहे.

चार्‍यात विष मिसळून ४५ गोवंशियांची हत्या करणार्‍या ४ ख्रिस्त्यांना अटक !

गोवंशियांची अमानुष हत्या करणार्‍या अशांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! धर्मांध मुसलमानांपाठोपाठ ख्रिस्तीही गोवंशियांच्या मुळावर उठले आहेत, हे या उदाहरणावरून दिसून येते !

मौलाना अर्शद मदनी यांच्या विधानासाठी आम्ही १०० वेळा क्षमा मागतो ! – मौलाना महमूद मदनी

संमेलनामध्ये जे काही झाले, ते चांगले नाही झाले. आम्हाला खंत आणि दुःख आहे. आमचा विश्वास आहे की, आमच्या कोणत्याही गोष्टीमुळे कुणाच्या भावना दुखवू नयेत; मात्र जर दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही १०० वेळा क्षमा मागतो, असे विधान जमियत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना (इस्लामचा अभ्यासक) महमूद मदनी यांनी केले.

हिंदु राष्ट्रासाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याकडून ७ दिवसांच्या यज्ञाला प्रारंभ

छतरपूर येथील गडा गावातील बागेश्वर धाम या तीर्थक्षेत्री पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी १३ फेब्रुवारीपासून भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी यज्ञ करण्यास प्रारंभ केला आहे. पुढील ७ दिवस हा यज्ञ करण्यात येणार आहे.

अमरावती येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !

हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि महावीर मिशन ट्रस्ट यांच्या वतीने अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात सभेला प्रारंभ !

काढलेली जलपर्णी तशीच नदीत सोडल्याने आळंदी (जिल्हा पुणे) येथील इंद्रायणी नदी जलपर्णीमय !

डुडुळगाव ते आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पिंपरी महापालिकेच्या माध्यमातून चालू आहे; परंतु पाण्यातील जलपर्णी काढल्यानंतर ती नदीच्या काठावर न टाकता ती तशीच नदीत पुढे ढकलली जात आहे.

पोहरादेवी येथे बंजारा समाजासाठी ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी, नगारा भवन येथे ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच ५० कोटी देण्याचीही घोषणा या वेळी केली.

‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयी आयआयटी, पवई येथे कार्यशाळा

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारतातील अतीउष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची कार्यवाही, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत ‘मोबाईल टॉवर्स’ना नोटिसा !

महापालिकेची अनुमती न घेता बाजार समिती आणि व्यापारी यांनी काही ठिकाणी गाळ्यांवर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारले आहेत.

सातारा नगरपालिकेकडून १०० हून अधिक अनधिकृत ‘फ्लेक्सबोर्ड’ शासनाधीन !

अनधिकृतपणे शहरातील चौकाचौकांमध्ये फ्लेक्सबोर्ड लावून स्वतःची जाहिरात करणार्‍या तथाकथित समाजसेवक आणि जाहिरातदार यांच्यावर नगरपालिकेच्या ‘अतिक्रमण हटाव विभागा’च्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.