चार्‍यात विष मिसळून ४५ गोवंशियांची हत्या करणार्‍या ४ ख्रिस्त्यांना अटक !

अटक करण्यात आलेले आरोपी

चंडीगड – हरियाणातील करनाल येथील नंदीग्राम गोशाळेत गोवंशियांच्या चार्‍यात विष मिसळून ४५ गायींची हत्या केल्याच्या प्रकरणी विशाल, रजत, सूरज आणि सोनू या बाटग्या ख्रिस्त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अमर नावाचा सूत्रधार फरार आहे. अटक करण्यात आलेले चारही जण मृत गोवंशियांना कह्यात घेणार्‍या ठेकेदाराकडे कामाला आहेत. या गोशाळेत गोवंशियांचे मृत होण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे गोवंशियांची हाडे, चरबी आणि चामडी यांच्या विक्रीचे प्रमाण अल्प होऊन त्यांच्या धंद्यावर विपरित परिणाम होत होता. या कारणामुळे त्यांनी गोवंशियांची हत्या केली.

१. २६ जानेवारी २०२३ पासून प्रत्येक रात्री एकेका गोवंशियाला मारण्याची प्रक्रिया चालू झाली. काही कालावधीनंतर ४५ गोवंशीय काही ठराविक दिवसांच्या अंतराने मरण पावले.

२. या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन करून  चौकशी करण्याचा आदेश दिला होता.

३. चौकशीच्या वेळी विशाल आणि रजत यांनी मृत गोवंशियांच्या विक्रीतून त्यांना ८ ते १० सहस्र रुपये मिळत असल्याची माहिती दिली. हे दोघे जण गोशाळेतून मृत गोवंश कह्यात घेऊन त्याची विक्री करत असत.

४. या चौघांनी यापूर्वीही ३-४ वेळा अशा प्रकारे गोवंशियांना विष देऊन त्यांची हत्या केली होती.

५. या गोशाळेतील मृत गोवंशियांना उचलण्याचे काम काँग्रेसच्या नेत्या राणी कंबोज यांचे पती दीपक मेहरा यांना देण्यात आले आहे. मेहरा यांनी हा ठेका अमित यांना दिला होता. ४५ गायी मृत झाल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. त्यात राणी कंबोज सहभागी झाल्या होत्या.

संपादकीय भूमिका

गोवंशियांची अमानुष हत्या करणार्‍या अशांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! धर्मांध मुसलमानांपाठोपाठ ख्रिस्तीही गोवंशियांच्या मुळावर उठले आहेत, हे या उदाहरणावरून दिसून येते !