आरे परिसरात हिंदूंच्या मोर्च्यात पोलिसांचा लाठीमार

येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने राममंदिराच्या शेजारी कब्रस्तानला जागा देण्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यावर पोलिसांनी लाठीमार केला. मोठ्या संख्येने हिंदु धर्माभिमानी भगवे ध्वज आणि फलक घेऊन येथे आले होते.

खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णखाटांची संख्या दुप्पट केली !

कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्ण खाटा आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हल्लीच्या काळात ‘जशी प्रजा, तसा राजा’ !

‘यथा राजा तथा प्रजा ।, म्हणजे ‘जसा राजा, तशी प्रजा’, उदा. रामराज्यात रामाप्रमाणे सर्व प्रजा सात्त्विक होती. आता ‘यथा प्रजा तथा राजा ।’, म्हणजे ‘जशी प्रजा, तसा राजा’, अशी स्थिती झाली आहे, म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या प्रजेने निवडून दिलेले शासनकर्ते तसेच आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मदनी यांची चिथावणी !

‘धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते सहन करायचे अन् पुन्हा त्यांच्याशी गुण्यागोविंदाने रहायचे, ‘हिंदू हे भोळे, सर्वधर्मसमभावी, सहिष्णु आहेत, जातीजातींमध्ये भांडतील; पण शत्रूविरुद्ध एक होणार नाहीत’, ही लक्षणे धर्मांधांनी पुरती ओळखली आहेत. त्यामुळे ते बिनभोबाट काहीही विधाने करतात.

मुसलमान काशी आणि मथुरा येथील मंदिरे परत करतील का ?

‘जमियत’च्या ‘सद्भावना संमेलना’त मौलाना अर्शद मदनी यांनी ‘अल्ला आणि ॐ एकच आहे’, असे विधान केल्यावर उपस्थित जैन मुनी लोकेश यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यासह अन्य धर्मीय संतांनी मंच सोडला. 

वृद्धाश्रम : हिंदु संस्कृतीवरील कलंक !

आई-वडिलांनाच ईश्वर मानून त्यांची सेवा करणार्‍या श्रावण बाळाची आपली संस्कृती असतांना सरकारला ‘श्रावण बाळ योजना’ आणावी लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. आपले आई-वडील मुलांना जड व्हावेत इतकी वाईट वृत्ती समाजात वाढली आहे, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

असे हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…!

छत्रपती संभाजी महाराज हे ‘स्वराज्यरक्षक’ कि ‘धर्मवीर’ ? अशी राळ समाजात उठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उगाच चर्चेला तोंड फोडले आहे. तसे पहाता या दोन्हीही प्रचलित शब्दांमध्ये कुठलाच कधी भेद नव्हता.

‘कन्सिलिएशन’ (सामोपचार) : न्यायालयाच्या बाहेर वाद मिटवण्याची कायदेशीर पद्धत !

अहंकाराची जागा जर प्रेम आणि विवेक यांनी घेतली, तर वाद मिटून सुसंवाद निर्माण होतो. दोन्ही दावेदारांमधील अहंकार बाजूला सारून मध्यस्थी करून वाद संपुष्टात आणण्याचे काम ‘कन्सिलिएटर’ करतात.

‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र आणि भारत

भारताने ‘अग्नी ५’ या आंतरखंडीय ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राची (मिसाईलची) चाचणी घेतली. या चाचणीत ‘अग्नी ५’ने रात्रीच्या अंधारात ठरलेल्या मार्गाने ५ सहस्र ४०० किलोमीटरहून अधिकचा पल्ला पार करून लक्ष्यभेद केला. भारताने ही चाचणी यशस्वी झाल्याचे जागतिक पातळीवर स्पष्ट केले आहे.

कापसाचा शोध लावून संपूर्ण जगाचे लज्जारक्षण करणारे महर्षि गृत्समद !

‘ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलाचे द्रष्टे महर्षि गृत्समद यांनी स्वतःची कर्मभूमी विदर्भातील श्री चिंतामणी गणेशाचे तीर्थस्थान कळंब येथे वस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त अशा तंतुमय कापसाचा क्रांतीकारी शोध लावला. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने त्याची सर्वप्रथम लागवड केली.’