हिंदूंवर झालेल्‍या अन्‍यायाविरोधात ज्‍यांना आवाज उठवायचा आहे, त्‍यांनी माझ्‍यासमवेत यावे ! – आनंद दवे, हिंदु महासंघ

कसबा पोटनिवडणूक

श्री. आनंद दवे

पुणे – आम्‍ही हिंदुत्‍वाची लढाई लढत आहोत. आम्‍ही हिंदु समाजासाठी काम करत आहोत. त्‍याचा कुणावर काय परिणाम होतो, याची हिंदु महासंघाने काळजी करण्‍याचे काहीच कारण नाही. ही निवडणूक आम्‍ही गांभीर्याने आणि जिंकण्‍यासाठीच लढवत आहोत. आम्‍ही अर्ज मागे घेणारच नाही. माझा ‘अजेंडा’ म्‍हणजे पुण्‍येश्‍वर मंदिर मुक्‍त करावे, हिंदूंवर झालेल्‍या अन्‍यायाविरोधात ज्‍यांना आवाज उठवायचा आहे, त्‍यांनी माझ्‍यासमवेत यावे. आम्‍ही केवळ आणि केवळ हिंदूंच्‍या मतासाठी हिंदूंच्‍या घरात जाऊन प्रचार करणार आहे. उमेदवार जेव्‍हा निवडणूक लढतो, तेव्‍हा प्रत्‍येकाचा ठोकताळा असतो, त्‍यांना शुभेच्‍छा; पण हिंदु महासंघच निवडून येणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्‍यानंतर आनंद दवे यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. त्‍या वेळी ते बोलत होते.

कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सिद्धता चालू केली आहे. विविध संघटना, पक्ष यांच्‍या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. हिंदु महासंघाचे अध्‍यक्ष आनंद दवे यांनीही अर्ज भरला आहे. त्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांची रणनीतीही सांगितली आहे.