नागपूर येथे बसखाली चिरडून महिलेचा मृत्‍यू !

नागपूर – शहरातील काँग्रेसनगरकडून धंतोली पोलीस ठाण्‍याकडे जाणार्‍या मार्गाने दुचाकीवरून शीतल यादव (वय ४२ वर्षे) जात होत्‍या. त्‍या वेळी रस्‍त्‍यावर उभ्‍या असलेल्‍या मालवाहतूक पिकअप व्‍हॅनच्‍या चालकाने बाहेर न पहाता वाहनाचा दरवाजा उघडला. त्‍यामुळे मागून येणार्‍या यादव या त्‍या दरवाजाला धडकून रस्‍त्‍यावर पडल्‍या. त्‍याच वेळी राज्‍य परिवहन महामंडळाची बस आली. त्‍याच्‍या खाली गेल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. पोलिसांनी आरोपी अमित याला अटक केली आहे.