भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्थाही उपलब्ध !
नाशिक – महाराष्ट्रातील शक्तिपिठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त मंडळाने गर्दीचे नियोजन आणि नियंत्रण होण्यासाठी प्रतिभाविक १०० रुपयांप्रमाणे सशुल्क दर्शन सुविधा १३ फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही सुविधा भाविकांसाठी ऐच्छिक असून भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्था आहे, तशी उपलब्ध असेल. ऐच्छिक सशुल्क ‘व्हीआयपी’ दर्शन सुविधेचा लाभ घेणार्या १० वर्षांच्या आतील वयोगटांतील भाविकांना पास निःशुल्क असणार आहे.
वर्षभरातील चैत्र आणि नवरात्र उत्सव, पौर्णिमा, त्याचसमवेत मंगळवार, शुक्रवार आणि रविवार आदी दिवशी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी असते. सशुल्क व्हीआयपी दर्शनपास हे विश्वस्त संस्थेचे मुख्य कार्यालय आणि उपकार्यालय येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांना उपलब्ध होणार आहेत. सशुल्क व्हीआयपी दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांना जलद भगवतीदर्शन सुविधेची संधी उपलब्ध होणार आहे. सप्तशृंगी गडावरील स्थानिक ग्रामस्थांना आधारकार्ड पडताळून विनामूल्य दर्शन सुविधा देणार आहे, अशी माहिती विश्वस्त संस्थेने दिली आहे.
संपादकीय भूमिका
|