श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील आयुर्वेदतज्ञ वैद्य मकवाना यांना ‘आयुर्वेदरत्न २०२३’ पुरस्कार !

७ आणि ८ जानेवारी या दिवशी धुळ्यातील आयुर्वेद क्षेत्रातील ज्येष्ठ आणि ऋषितुल्य वैद्य कै. प्र.ता. जोशी (नाना) यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवाद गुरुस्मरण २३’चे आयोजन केले होते. यात भारतभरातील १ सहस्र २०० वैद्य सहभागी झाले. विविध आयुर्वेदतज्ञांनी मार्गदर्शन केले.

हिंदु राष्ट्र हे संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व यांनी युक्त असलेले राष्ट्र असेल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेचे विष आपल्यात पेरले जात आहे, ते आपल्याला संघटितपणे हाणून पाडायचे आहे. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हा एकच उपाय आहे.

ए.पी.एम्.सी. वाहतूक शाखेच्या वतीने ५०० हून अधिक रिक्शाचालकांचे प्रबोधन !

‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३’च्या निमित्ताने ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने ए.पी.एम्.सी. परिसरातील ५०० हून अधिक रिक्शाचालकांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरस्त्राण (हेल्मेट) घालण्याविषयी जनजागृती करून विनामूल्य शिरस्त्राणाचे वाटप करण्यात आले.

वर्ष २०२३ मधील शनि ग्रह पालट

ज्‍योतिष शास्‍त्रानुसार प्रत्‍येक ग्रहाच्‍या शुभ आणि अशुभ अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा शुभच असतो, असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्‍याही दोन बाजू आहेत; पण शनि ग्रहाची केवळ एकच बाजू विचारात घेतली जाते; म्‍हणूनच लोकांच्‍या मनात शनि ग्रहाविषयी भीती निर्माण होते.

नद्यांचे प्रदूषण ?

नद्यांमध्‍ये असलेल्‍या गाळामुळे त्‍यांची वहन, साठवण क्षमता न्‍यून होणे, असे गंभीर दुष्‍परिणाम होत असल्‍याचे दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नदीच्‍या समस्‍यांचा अभ्‍यास करून त्‍या सोडवण्‍यासाठी ‘चला जाणूया नदीला’, या अभियानाला प्रारंभ करण्‍यात आला आहे.

नामांकनाविषयी (‘नॉमिनी’विषयी) समज-अपसमज !

‘एखाद्याला ‘नॉमिनी’ केले की, काहींच्‍या कुटुंबात वाद निर्माण होतात. यामुळे ‘कायदेशीर वारसांचा हक्‍क हिरावला गेला’, असे त्‍यांना वाटते. ज्‍या ज्‍या ठिकाणी संबंधित व्‍यक्‍तीला ‘नॉमिनी’ नेमलेले असते, ‘तेथील मालकी आता गेली असून आमच्‍यावर अन्‍याय झाला’, असा अपप्रचार करण्‍यात येतो.

देवद येथील सनातनच्‍या आश्रमातील आनंद, उत्‍साह आणि चैतन्‍य यांनी भारलेले साधक अन् देवद आश्रमातील विलक्षण पालट झालेले वातावरण !

देवद आश्रमात आल्‍यावर मला ‘आश्रमात पुष्‍कळ पालट झाला आहे’, असे जाणवले. ‘देवाने मला आश्रमातील वातावरण आणि साधक यांमध्‍ये झालेले चांगले पालट अनुभवण्‍याची अन् त्‍यातून शिकण्‍याची संधी दिली’, असे मला वाटले.

कापडावर ‘हाताने घातलेले टाके’ आणि ‘शिवणयंत्राने घातलेले टाके’ यांत जाणवलेला भेद !

‘माझ्‍या एका जुन्‍या साडीच्‍या ‘फॉल’ची शिलाई उसवली होती. आधी माझ्‍या साडीच्‍या ‘फॉल’च्‍या खालच्‍या भागाला शिवणयंत्राची शिलाई होती. त्‍यानंतर मी उसवलेल्‍या भागावर हाताने शिलाई केली. आधी शिवणयंत्राने घातलेले टाके आणि नंतर हाताने घातलेले टाके यांवरून हात फिरवतांना मला दोन्‍ही धाग्‍यांतील स्‍पंदनांमध्‍ये भेद जाणवला.

स्‍वतःतील स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे मनाला होत असलेली जखम बरी होण्‍यासाठी औषधरूपी स्‍वयंसूचना देण्‍याचे महत्त्व !

गुरुदेवांच्‍या कृपेने मला साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेण्‍याची सेवा मिळाली आहे. त्‍याविषयी चिंतन करतांना गुरुदेवांनी मला सुचवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्‍कर हिने रामनाथी आश्रमातील ‘प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तू यांवर सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव लिहिलेे आहे’, असा भाव ठेवल्‍यावर तिला जाणवलेली सूत्रे !

एका भावसत्‍संगात योगिताताईंनी सांगितले, ‘‘आपल्‍या प्रत्‍येक पेशीवर गुरुदेवांचे नाव लिहिले आहे’, असा भाव दिवसभर अनुभवण्‍याचा प्रयत्न करा.’’ या भावसत्‍संगाच्‍या नंतर ‘केवळ माझ्‍याच शरिराच्‍या प्रत्‍येक पेशीवर नाही, तर रामनाथी आश्रमातील प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तू यांवरही सूक्ष्मातून गुरुदेवांचे नाव लिहिले आहे’..