वर्ष २०२३ मधील शनि ग्रह पालट

ज्‍योतिष शास्‍त्रानुसार प्रत्‍येक ग्रहाच्‍या शुभ आणि अशुभ अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा शुभच असतो, असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्‍याही दोन बाजू आहेत; पण शनि ग्रहाची केवळ एकच बाजू विचारात घेतली जाते; म्‍हणूनच लोकांच्‍या मनात शनि ग्रहाविषयी भीती निर्माण होते.