हिंदु राष्ट्र हे संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व यांनी युक्त असलेले राष्ट्र असेल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वनिष्ठांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

दीपप्रज्वलन करतांना श्री. सुनील घनवट आणि वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

ठाणे, १५ जानेवारी (वार्ता.) – हलाल जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद यांच्या माध्यमातून भारतात वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे कारस्थान इस्लामी संघटनांकडून चालू आहे. धर्मनिरपेक्षतेचे विष आपल्यात पेरले जात आहे, ते आपल्याला संघटितपणे हाणून पाडायचे आहे. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हा एकच उपाय आहे. वर्ष २०२५ पर्यंत संतांचा संकल्प आणि ईश्वराचा आशीर्वाद यांमुळेच आपण हिंदु राष्ट्राची पहाट पहाणार आहोत. जोपर्यंत हिंदु राष्ट्र स्थापन होत नाही, तोपर्यंत कुठलाही मावळा शांत बसणार नाही. हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नव्हे, तर संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व या सर्वांनी युक्त असलेले राष्ट्र असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते ठाणे येथील नौपाडा भागात असलेल्या शिवस्मृती मित्रमंडळाच्या मैदानात १४ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.

वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे आणि श्री. सुनील घनवट

सभेचा प्रारंभ शंखनाद, वेदमंत्रपठण करून करण्यात आला. मान्यवर वक्त्यांनी दीपप्रज्वलन केले. श्री. सुनील घनवट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि ठाणे येथील संत पू. राजकुमार केतकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक भास्कर पाटील हेही या वेळी उपस्थित होते. वक्त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची शपथ घेतली.

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करा’, अशी मागणी करून मार्गदर्शन केले.

अभिप्राय 

या सभेला कथक नृत्य आचार्य पू. राजकुमार केतकर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी हिंदू जनजागृती समितीचा उपक्रम सर्व देशभर व्हावा ही नटराज्याच्या चरणी प्रार्थना. हिंदू म्हणून आम्ही सहभागी आहोत असा अभिप्राय दिला.

आज आढावा बैठक

• स्थळ : अत्रे कट्टा, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे (प.)

• वेळ : रात्री ८