पुणे – भाजपचे नेते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे ३ जानेवारी या दिवशी वयाच्या ६० व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सुमित्रा भंडारी या परभणी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नानासाहेब वेलणकर यांच्या कन्या होत्या. विविध समाजकार्यातही त्या कार्यरत होत्या. विद्यार्थिनी असल्यापासून त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करत होत्या. विवाहानंतर त्यांनी पुणे, कोकण भागांमध्ये विविध सामाजिक संघटनांसमवेत कार्य केले. भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांनी सुमित्रा भंडारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिववावर ४ जानेवारी या दिवशी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > भाजपचे नेते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन
भाजपचे नेते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन
नूतन लेख
- बजरंग दलाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर गणेशोत्सव मंडळाने विडंबनात्मक श्री गणेशमूर्तीचे केले विसर्जन !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सांगवी (पिंपरी) येथे कोयत्याने तिघांवर वार ! ,पुणे येथे चिमुकल्यावर कुत्र्यांचे आक्रमण !..
- आरक्षणाविषयीच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेकडून राहुल गांधीच्या चित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन !
- ऑगस्टमध्ये एस्.टी. महामंडळ प्रथमच १६.८६ कोटी रुपयाने लाभात !
- ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची बजरंग दलाची मागणी
- पुणे महापालिकेचे भाविकांना हौदामध्ये विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन !