सोलापूर – दारूबंदी कायद्यानुसार नोंद असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी सहकार्य करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील जवान मलंग तांबोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
तक्रारदाराच्या विरोधात ऑक्टोबर २०२२ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथे दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराला जामीन मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याचा मोबदला म्हणून भरारी पथकातील जवान मलंग तांबोळी यांनी ३० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.