आष्टा (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास अनुमती !

आष्टा बंद मागे

आष्टा (जिल्हा सांगली) – आष्टा येथे २ दिवसांपूर्वी शिवप्रेमींनी एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्याच्या अनावरणासाठी मंडप घालण्यात आला होता. अनुमती न घेता अवैधरित्या पुतळा बसवल्याचे कारण पुढे करत पोलीस प्रशासनाने ३ जानेवारीला सायंकाळी मंडप हटवला होता, तसेच मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही हटवला होता. याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी ४ जानेवारीला आष्टा-वाळवा बंदची हाक दिली होती. दुपारनंतर प्रशासनाने नमते घेत हा पुतळा बसवण्यास अनुमती दिली. त्यामुळे आष्टा बंद मागे घेण्यात आला.