आरोपी सचिन वाझे यांच्याकडून कारागृहात असभ्य वर्तन !

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

तारांकित हॉटेलसाठी सिडकोने दिलेला भूखंड त्याच उद्देशाने वापरला जाणार का ? याविषयी साशंकता !

बेलापूर येथील सेक्टर २३ मधील एका तारांकित हॉटेलसाठी सिडकोने दिलेला भूखंड ई-निविदा आणि ई-लिलाव पद्धतीने त्यांनी विक्रीस काढला आहे.

(म्हणे) ‘मतपेटीसाठी चाललेल्या राजकारणातून ‘मुसलमान त्रास देतात’, असा अपप्रचार केला जातो !’

‘गुरुकुल विश्वपीठा’चे संस्थापक डॉ. अजयचंद्र भागवतगुरुजी यांची मुक्ताफळे

असे चित्रपट काढाल, तर गाठ माझ्याशी ! – छत्रपती संभाजीराजे

हिंदु सहिष्णु असल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो. हिंदूंनी आतातरी जागरूक होऊन स्वतःच्या श्रद्धास्थानांचे विडंबन वैधमार्गाने रोखावे !

त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथे त्रिपुरारी पौर्णिमेची १५५ वर्षांची परंपरा असलेली रथयात्रा आजपासून चालू !     

२ वर्षांनंतर यात्रा निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असणार आहे. सद्यस्थितीत रथयात्रेची सिद्धता चालू असून ४० सहस्रांहून अधिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पुणे येथे महिलेस पोलीस ठाण्यात बोलावून पुष्कळ मारहाण करणार्‍या पोलिसावर १५ दिवसांनंतर गुन्हा नोंद !

रस्त्यामध्ये अडथळा होत असलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याचा राग धरून पोलीस कर्मचारी राहुल शिंगे यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी एका ५० वर्षीय महिलेला पोलीस चौकीमध्ये बोलावून मारहाण केली.

विधानसभेच्या अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी !

विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या. त्यांना एकूण ६६ सहस्र ५३० इतकी मते मिळाली.

नागपूर येथील ३ मोठ्या व्यावसायिक समूहांवर आयकर विभागाची धाड !

कारवाईच्या दुसर्‍या दिवशी याच पथकाने विविध ठिकाणांहून महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि दागिने जप्त केले आहेत, तर काही ठिकाणी मारलेल्या धाडीत पथकाच्या हाती काहीही लागले नाही. या कारवाईविषयी आयकर विभागाच्या वतीने अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे.

नागपूर येथील अधिवेशनाच्या वेळी कर्मचार्‍यांनी नातेवाइकांकडे मुक्काम केल्यास निवासी जागा मिळणार नाही !

येथे १९ डिसेंबरपासून चालू होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून नागपूर येथे येणार्‍या कर्मचार्‍यांना सरकारी निवासातच मुक्काम करावा लागेल.

नेपाळला हवे हिंदु राष्ट्र !

नेपाळहून अधिक हिंदू भारतात आहेत. ‘भारतालाच हिंदु राष्ट्र घोषित केल्यास नेपाळसह अन्य अनेक देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील’, असे पुरीचे शंकराचार्य यांनी म्हटले आहे. शासनकर्त्यांनी ते मनावर घ्यावे, ही हिंदूंची अपेक्षा !