माझ्या विनयभंगाविषयी राज्य महिला आयोगाची भूमिका मला पहायची आहे ! – रिदा रशीद, महामंत्री, महिला मोर्चा, भाजप

रिदा रशीद

मुंबई – मी सुप्रिया सुळे यांना विचारेन की, ज्या पद्धतीने माझ्याशी घटना घडली तीच परंपरा आहे का ? महिलांना असेच ढकलून देत बाजूला लोटता का ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असेच होते का ? यावर महाराष्ट्र महिला आयोग काय भूमिका घेते ? हे  मला पहायचे आहे. ते माझ्या बाजूने उभे रहाण्याची मी वाट पहात आहे, असा भूमिका जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवणार्‍या भाजपच्या महिला मोर्च्याच्या महामंत्री रिधा रशीद यांनी मांडली. १४ नोव्हेंबर या दिवशी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्वत:ची भूमिका मांडली.

या वेळी रिदा रशीद म्हणाल्या, ‘‘महिला आयोग महिलांसाठी आहे, तर त्यांनी कारवाई केल्यास मला आवडेल. मी स्वतः महिला आयोगाकडे जाईनच; परंतु त्यांनी स्वतः याची नोंद घ्यायला हवी. मुंब्रा येथे माझी एक संस्था आहे. तेथे एक सामान्य व्यक्ती म्हणूनच मी काम करते. मला लोक ‘भाजप’ म्हणून अल्प आहे. ‘सामाजिक काम करते’, अशीच माझी ओळख आहे. मी राजकारण करत नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. घटनेनंतर मुख्यमंत्री त्वरित निघून गेले. माझी त्यांच्याशी भेट झाली नाही.’’