पुणे येथील विद्याश्रम शाळेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन

विद्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करतांना वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर

पुणे – येथील माळवाडी भागातील विद्याश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मासिक पाळी संदर्भात घ्यावयाची काळजी’, या विषयावर १० नोव्हेंबर या दिवशी मार्गदर्शन घेण्यात आले. याविषयी वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ७६ विद्यार्थिनींनी घेतला. या मार्गदर्शनामध्ये मुलींनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची ? तसेच आहार आणि व्यायाम यांचेही महत्त्व सांगितले. या वेळी वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर यांनी मुलींच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.