‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजातील जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

कोल्हापूर – ‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभाग, कोकण, गोवा तसेच गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. भवानी मंदिर, जवाहरनगर येथे ‘हलाल जिहाद’ या विषयावर सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजातील जिज्ञासूंना त्यांनी मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे उपाध्यक्ष श्री. तुलसीराम लटकन, सचिव श्री. किरण झाड, संचालक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रीतम पवार यांसह अन्य संचालक अन् मान्यवर उपस्थित होते. हे व्याख्यान ऐकल्यावर ‘समाजातील लोकांचे व्यापक प्रमाणात प्रबोधन होण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करूया’, असे उपस्थित सर्वांनी सांगितले.