भारताचा शत्रू भ्रष्टाचार !

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना ‘शेतकर्‍याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’, असा आदेश दिला होता. याचाच अर्थ तेव्हाही भ्रष्टाचार चालूच होता, मात्र महाराजांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. कारण ते धर्माचरणी, न्यायप्रिय आणि विरक्त होते. असे शासनकर्ते आणण्यासाठी जनतेला संघर्षच करावा लागेल !

रेडियमपट्टी आणि रिफ्लेक्टर न लावणार्‍या वाहनचालकांवर कारवाई ! – समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

समीर शेख पुढे म्हणाले की, अनेक ऊस वाहतूक करणारे वाहनचालक वाहनांच्या मागील बाजूस रेडियमपट्टी किंवा रिफ्लेक्टर न लावताच वाहने चालवतात, तसेच कर्णकर्कश आवाजात गाणी लावून अपघाताला निमंत्रण देत असतात.

गायरान भूमीवरील अतिक्रमण न काढण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते दिशाभूल करत आहेत ! – चंद्रकांत पाटील

न्यायालयाचा निर्णय असतांनाही गायरान भूमीवरील अतिक्रमण काढू न देण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते लोकांची दिशाभूल करत आहेत, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पुणे महापालिकेच्या ‘सारथी’वर तक्रारी करूनही दुर्गंधीची समस्या सुटेना !

अनेक लोकांना या दुर्गंधीमुळे उलटी, डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे असे त्रास आहेत. याचा लवकर निपटारा केला गेला नाही, तर आणखी तीव्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून धर्मांध कुटुंब पसार !

मृत महिलेचा येथील शाहिद कुरेशी समवेत ६ मासांपूर्वी विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी ५ लाख रुपये देऊनही सासरच्या लोकांकडून पुन्हा १० लाख रुपयांची मागणी केली जात होती.

‘लव्ह जिहाद’चा अमानुष चेहरा जाणा !

देहलीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या आफताब शेख याने प्रेयसी श्रद्धा मदान हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे केले. त्याने हे तुकडे शीतकपाटात ठेवून १८ दिवस प्रतिदिन रात्री थोडे थोडे तुकडे बाहेर फेकले.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको !

निर्णयप्रक्रियेतील दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण करिअरवर परिणाम होऊ शकतो, तसेच त्यांचे मानसिक खच्चीकरणही होते. हे सर्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा चांगला राखणे आवश्यक आहे.

सरकारी अधिकारी वा कर्मचारी यांचे स्थानांतर कधी होणार ?

सरकारी कर्मचार्‍यांच्या स्थानांतर प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप असतो, हे पुन्हा एकदा अप्रत्यक्ष सिद्ध होत आहे. ‘आतातरी प्रशासन पारदर्शकपणे स्थानांतर प्रक्रिया तत्परतेने करणार का ?’, हाच एक प्रश्न सरकारी कर्मचार्‍यांच्या समोर उभा आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्त्वाचे त्यांच्या निकटवर्तियांनी उलगडलेले पैलू

आज १५ नोव्हेंबर २०२२ या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रथम पुण्यस्मरण (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

अभ्यासूवृत्ती आणि ज्ञानलालसा !

‘आता आपल्याला सर्व काही कळले आहे. याहून अधिक काही जाणून घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. सर्व विषयांचे परिपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे’,  अशी जर कुणाची धारणा असेल, तर तो निवळ मूर्खपणा आहे.