आमचे सरकार कोणतीही कारवाई सूडबुद्धीने करणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस नियमानुसार पडताळणी करून कार्यवाही करतात. महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल, तर आव्हाड यांच्यावर कारवाई होईल. आमचे सरकार राजकीय द्वेषापोटी कारवाई करणार नाही. सरकार कायद्यानुसार आणि लोकशाहीनुसार चालते. कोणतीही कारवाई सूड भावनेपोटी केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली.