अरबी देश इस्लामी नियम नाकारत आहेत, तर भारत स्वीकारत आहे ! – तस्लिमा नसरीन

प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – सौदी अरेबियाने जाहीर केले आहे की, महिला यात्रेकरूला हज किंवा ‘उमराह’ (इस्लामी तीर्थक्षेत्रांची) यात्रा करण्यासाठी पुरुषासमवेत येण्याची आवश्यकता नाही. अरब देश हळूहळू इस्लामी नियम नाकारत आहेत; मात्र बिगर अरबी देश उदाहरणार्थ भारत इस्लामी नियम त्वरित स्वीकारत आहेत’, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून व्यक्त केली आहे.