(म्हणे) ‘हिंदूंना १ पत्नी आणि ३ प्रेयसी असतात; मात्र सन्मान कुणालाच नसतो, तर मुसलमानांनी २ विवाह केले, तरी दोघांचा सन्मान करतात !’  

उत्तरप्रदेशचे एम्.आय.एम्.चे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांचे हिंदुद्वेषी विधान !

उत्तरप्रदेशचे एम्.आय.एम्.चे प्रदेशाध्यक्ष शौकत अली

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – लोक म्हणतात आम्ही (मुसलमान) ३ लग्न करतो. आम्ही २ जरी लग्न केले, तरी दोन्ही पत्नींना समाजात आदर देतो; मात्र हिंदू एकच लग्न करतात आणि त्यांना ३ प्रेयसी असतात. ते पत्नी आणि प्रेयसी दोघांचाही सन्मान करत नाहीत. याउलट आम्ही जर २ लग्न केली, तर दोन्ही पत्नींच्या मुलांची नावे शिधापत्रिकेवर (रेशन कार्डवर) नोंदवतो, असे विधान उत्तरप्रदेशचे एम्.आय.एम्.चे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी एका सभेला संबोधित करतांना केले.

हिजाबवरील (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) बंदीच्या सूत्रावर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर शौकत अली म्हणाले की, देशात कोणता पोशाख घालावा, हे हिंदुत्व नाही, तर राज्यघटना ठरवणार. अशा प्रकारची सूत्रे उपस्थित करून भाजप देशाला तोडण्याचे काम करत आहे. (भारताला तोडण्याचे काम मुसलमानांनी वर्ष १९४७ मध्ये केले आहे. तसेच काश्मीरमध्ये वर्ष १९८९ मध्ये लाखो हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडून जिहादी मुसलमान पुन्हा भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, याविषयी शौकत अली का बोलत नाहीत ? – संपादक) मदरसा, जमावाकडून हत्या, वक्फ आणि हिजाब यांसारखी सूत्रे उपस्थित केल्याने आम्हाला लक्ष्य करणे भाजपला सोपे जाते. जेव्हा भाजप कमकुवत होतो, तेव्हा तो मुसलमानांचे सूत्रे उपस्थित करतो, असा आरोप अली यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘मुसलमान एका पत्नीचे पोषण करू शकत नसेल, तर दुसरे लग्न करू शकत नाही’, असे कुराणमध्ये म्हटले असतांनाही ते दुसरे विवाह करतात, यावरून नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते, हे शौकत अली का सांगत नाहीत ?
  • विवाहित मुसलमान तरुण स्वतःचा धर्म लपवून हिंदूं तरुणींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवणूक करतात, याविषयी शौकत अली गप्प का आहेत ?