राष्ट्रीय हरित लवादाकडून कर्नाटक सरकारला २ सहस्र ९०० कोटी रुपयांचा दंड

पर्यावरणाला हानी पोचवल्याचे प्रकरण

नवी देहली – राष्ट्रीय हरित लवादाने कर्नाटक सरकारला पर्यावरणाला हानी पोचवल्याच्या प्रकरणी २ सहस्र ९०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. कर्नाटक सरकारने कचर्‍याचे व्यवस्थापन नीट न केल्याने पर्यावरणाची हानी झाल्यावरून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

देशातील प्रत्येक राज्याची माहिती घेऊन अशा प्रकारचा दंड वसूल करून तो पर्यावरणाच्या रक्षणावर खर्च करण्यास प्रारंभ करण्यात आला, तर प्रशासनाला वचक बसेल !