देहलीमधील मदरशाच्या मौलवीकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

नवी देहली – देहलीतील मदिना मदरशाच्या मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने) ११ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी करावल नगर येथील मदिना मशिदीतील मौलवी महंमद जावेद याला अटक केली.

देहलीतील शिव विहार परिसरातील करावल नगर येथील मदिना मशिदीच्या मदरशात हा विद्यार्थी गेली चार वर्षे शिकत होता. ११ ऑक्टोबर या दिवशी तो मदरशातून पळून घरी पोचला. त्याने मदरशाच्या मौलवी जावेदच्या कुकर्माची माहिती कुटुंबियांना दिली. यामुळे पीडित मुलाच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे त्वरित तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी मौलवीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३७७ कलमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

देशभरातील अनेक मदरशांमध्ये अशा प्रकारचे अपप्रकार होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आता यावर आळा घालण्यासाठी आणि मुसलमान मुलांना मुख्य प्रवाहाचे शिक्षण देण्यासाठी मदरशांना ताळे ठोकण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?