पाटलीपुत्र येथे गंगानदीत नौकाची टक्कर होऊन पाण्यात पडलेल्या ५० जणांपैकी १२ जण बेपत्ता

पाटलीपुत्र येथे गंगानदीमध्ये २ नौकांमध्ये झालेल्या टक्करीमुळे त्या नौका उलटल्या. यामुळे नौकेतील जवळपास ५० जण पाण्यात पडले.

कॅनडामध्ये १३ ठिकाणी चाकूद्वारे झालेल्या आक्रमणात १० जण ठार, तर १५ जण घायाळ

कॅनडाच्या सस्केचेवान प्रांतात जवळपास १३ ठिकाणी चाकूचा वापर करून करण्यात आलेल्या आक्रमणामध्ये १० जण ठार, तर जवळपास १५ जण घायाळ झाले आहेत. या प्रकरणी डेमियन सँडरसन (वय ३१ वर्षे) आणि माइल्स सँडरसन (वय ३० वर्षे) या आक्रमणकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

काबुल (अफगाणिस्तान) येथील रशियाच्या दूतावासाबाहेरील बाँबस्फोटात २० जण ठार

काबुल येथे ५ सप्टेंबरच्या दिवशी रशियाच्या दूतावासाबाहेर करण्यात आलेल्या आत्मघाती आक्रमणात २० हून अधिक जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये २ जण दूतावासाचे अधिकारी आहेत.

१४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या मदरशाच्या संचालकाला अटक

अशा वासनांधांना इस्लामी देशात ज्या प्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात पुरून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा दिली जाते, तशी शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

गोवा पोलिसांचे अमली पदार्थ व्यावसायिकांशी साटेलोटे !

अमली पदार्थ निगडित अन्वेषणासाठी गोवा पोलिसांचे आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचा आरोप भाग्यनगर पोलिसांनी केला आहे. भाग्यनगर पोलिसांचा हा आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहे.

गोव्यात ‘डार्कवेब’च्या आधारे अमली पदार्थ व्यवसाय !

‘डार्कवेब’ हा एक अनधिकृत ‘वेब ब्राउझर’ आहे. त्यावर ‘गूगल’, ‘याहू’ यांसारख्या ‘सर्च इंजिन’वर शोधून सापडणार नाहीत, अशी संकेतस्थळे यावर उपलब्ध आहेत. याचे अन्वेषण करणे हे पोलिसांपुढील एक आव्हान आहे !

पिंपरीत (पुणे) ‘आसवानी असोसिएट्स’ आणि ‘ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट’ या संस्थांच्या वतीने श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदांची निर्मिती !

हौदांत मूर्तीविसर्जन करणे, हे तर अशास्त्रीय आहेच, त्याहीपुढेही हे पापच आहे. याचे पातक केवळ मूर्तीदान करवून घेणार्‍यांनाच नव्हे, तर मूर्तीदान देणार्‍यांनाही लागेल !

जागतिक लोकसंख्येचा परिणाम !

पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ७५० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवजातही नष्ट होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कानपूर येथील गावात गोरक्षकाचा मंदिराच्या परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला !

राजेश द्विवेदी हे गोरक्षक होते. त्यांच्या घरासमोरच हे मंदिर आहे. त्यांच्या कुटुंबाने त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. द्विवेदी हे घायाळ आणि बेवारस जनावरांची देखभाल करत असत. त्यांच्यावर उपचार करत असत.