कानपूर येथील गावात गोरक्षकाचा मंदिराच्या परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला !

गोरक्षक राजेश द्विवेदी

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील ज्योतिष गावातील एका मंदिराच्या परिसरात ५२ वर्षीय राजेश द्विवेदी यांचा गळफास घेतल्याच्या स्थितीत मृतदेह आढळून आला. द्विवेदी हे गोरक्षक होते. त्यांच्या घरासमोरच हे मंदिर आहे. त्यांच्या कुटुंबाने त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

 (सौजन्य : Aaj Tak)

राजेश द्विवेदी यांचा मुलगा अंकित यांनी सांगितले, ‘‘माझे वडील घायाळ आणि बेवारस जनावरांची देखभाल करत असत. त्यांच्यावर उपचार करत असत. १० दिवसांपूर्वी गावातील काही जण बेवारस प्राण्यांना मारत होते. वडिलांनी त्याला विरोध केला होता. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी त्यांना गावातील काही साक्षीदारांसमवेत पोलीस ठाण्यात बोलावले होते. तत्पूर्वी त्यांचा मृतदेह मंदिरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला.’’