कॅनडामध्ये १३ ठिकाणी चाकूद्वारे झालेल्या आक्रमणात १० जण ठार, तर १५ जण घायाळ

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या सस्केचेवान प्रांतात जवळपास १३ ठिकाणी चाकूचा वापर करून करण्यात आलेल्या आक्रमणामध्ये १० जण ठार, तर जवळपास १५ जण घायाळ झाले आहेत. या प्रकरणी डेमियन सँडरसन (वय ३१ वर्षे) आणि माइल्स सँडरसन (वय ३० वर्षे) या आक्रमणकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कॅनडाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे आक्रमण असल्याचे सांगितले जात आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी या आक्रमणाविषयी शोक व्यक्त केला आहे. ‘या आक्रमणामागे नेमके काय कारण होते’, याविषयी अद्याप माहिती समजू शकलेली नाही.