पाटलीपुत्र येथे गंगानदीत नौकाची टक्कर होऊन पाण्यात पडलेल्या ५० जणांपैकी १२ जण बेपत्ता

पाटलीपुत्र (बिहार) – येथे गंगानदीमध्ये २ नौकांमध्ये झालेल्या टक्करीमुळे त्या नौका उलटल्या. यामुळे नौकेतील जवळपास ५० जण पाण्यात पडले. यातील १२ जण बेपत्ता असून अन्यांना नदीतून बाहेर काढण्यात आले आहे. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन्ही नौकांचे संतुलन बिघडल्याने ही घटना घडली.