देवीची ओटी कशी भरावी ?

खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !

देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ?

देवीला कुंकुमार्चन करण्याच्या दोन पद्धती, कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र आदींचा उहापोह या लेखात केला आहे. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रामुळे हा विषय वाचकांना समजून घेणे सोपे जाईल.

श्री दुर्गादेवीची उपासना

आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री दुर्गादेवी या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती या लेखात पाहूया.

नवरात्र : नऊही रात्री गरबा खेळणे

‘गरबा खेळणे’ यालाच हिंदु धर्मात टाळ्यांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे’, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय.

अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू !

‘हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तीवाद करतोस.’ अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तीवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देशभरात समान नागरी कायदा लागू करा ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री, गोवा

पुणे येथील ‘एम्.आय.टी.’ वर्ल्ड पेस विद्यापिठाच्या कार्यक्रमात प्रतिपादन

मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते. यातून ‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’, हा प्रश्न उरणार नाही !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या पार्थिव देहावर श्री क्षेत्र कांदळी (पुणे) येथे अंत्यसंस्कार !

प.पू. जीजींच्या पार्थिव देहाच्या दर्शनासाठी शेकडो भक्त श्री क्षेत्र कांदळी येथे आले होते. कांदळी येथे मध्यरात्रीपासून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा कार्यक्रम चालू होता.

५ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील ३१ सरकारी ग्रंथालये बंद पडली !

‘वाचनाची गोडी लागावी’, हे ध्येय असलेल्या ग्रंथालय संचालनालयाने ‘गाव तिथे वाचनालय’ करण्याचे उद्दिष्ट ठेवले; परंतु त्यालाच घरघर लागली आहे. वर्ष २०१७ ते २०२२ या ५ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील अनुमाने ३१ सरकारी ग्रंथालये बंद पडली आहेत.

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ !

न्यायालयाने खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत गेल्या ५० दिवसांपासून कारागृहात आहेत. १९ सप्टेंबर या दिवशी त्यांचा जामीन अर्ज आणि कोठडी यांविषयी एकत्रित सुनावणी पार पडली.