तलवारीने २० केक कापून धर्मांधाकडून व्हिडिओ प्रसारित !

बोरीवली येथील अक्रम शेख याने मित्रांसमवेत वाढदिवस साजरा करतांना तलवारीने २० केक कापले. १६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आला.

‘एन्.आय.ए.’ने न्यायालयाकडे आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी मागितला वेळ !

अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे हत्या प्रकरणी १९ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विशेष न्यायालयाकडे आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.

मुंबईत रस्ते घोटाळ्यामधील दोषी कंत्राटदाराला नवीन काम दिले !

दोषी कंत्राटदाराने या कामातही घोटाळा केला, तर त्याला उत्तरदायी कोण ? तसे झाल्यास संबंधित अधिकार्‍यांकडून या कामाचा खर्च वसूल करावा !

किल्ले शिवनेरी (पुणे) येथील ‘श्री शिवाईदेवी’ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची मागणी !

किल्ले शिवनेरीवरील ‘श्री शिवाईदेवी’च्या मूर्तीची झीज झाली असून मूर्तीला तडे गेले आहेत. कुसूर येथील ‘श्री शिवाईदेवी मंदिर ट्रस्ट’ने या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा निर्णय घेतला आहे.

राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा ? – राज ठाकरे, प्रमुख, मनसे

राज ठाकरे यांनी सांगितले, ‘‘नागपूर येथील मनसेची सर्व पदे विसर्जित करण्यात आली आहेत. घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी घोषित करण्यात येईल.”

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप प्रथम क्रमांकावर ! – आशिष शेलार, अध्यक्ष, भाजप, मुंबई

राज्यात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप प्रथम, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर दिसून येत आहे मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता चौथ्या क्रमांकावर गेली आहे.

झवेरी बाजार येथे बाँब ठेवल्याची धमकी देणार्‍याला अटक !

झवेरी बाजार आणि नगर येथे बाँब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिनेश सुतार याला अटक केली आहे. सुतार याने १८ सप्टेंबर या दिवशी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर दूरभाष केला होता.

परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांना निकालामध्ये दाखवले अनुपस्थित !

सोलापूर विद्यापिठाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर विद्यापिठामध्ये असे घडणे संतापजनक ! विद्यापिठाचा कारभार असा असेल, तर अशा  विद्यापिठामध्ये विद्यार्थी कसे घडणार ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

आवक घटल्यामुळे मुंबईत भाज्यांचे दर दुपटीहून अधिक वाढले !

राज्यात मागील आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे मुंबईमधील भाज्यांची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. भाज्यांचे दर दुपटीहून अधिक वाढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसला आहे.

पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी २० धरणे काठोकाठ भरली !

जिल्ह्यातील २६ धरणांपैकी २० धरणे काठोकाठ भरली असून अन्य ५ धरणांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक आहे, तर माणिकडोह हे धरण २० टक्के रिकामे आहे . पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के भरली आहेत.