जिहादी कट्टरतेविरोधात कोल्हापूर येथे बजरंग दल अन् हिंदु संघटना यांच्या वतीने आतंकवादाच्या पुतळ्याचे दहन !

राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांची आतंकवाद्यांनी दुकानात घुसून निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांनी धमकीचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र पसरवून भारताच्या एकात्मतेला आव्हानच दिले.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन !

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३ आणि ४ जुलै या दिवशी विशेष अधिवेशन बोलावले आहे. ३ जुलै या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

राजस्थान येथे कन्हैयालाल तेली यांची जिहादी धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. धर्मांधांकडून कायदा हातात घेऊन असे कृत्य होणे, हे धक्कादायक आहे. या संदर्भात कन्हैयालाल यांनी तक्रार केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

हिंदूंचे आशादायी सरकार !

अनेक संत-महात्मे ‘लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असे सांगत आहेत. ‘एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिंदुत्वरक्षक मुख्यमंत्री लाभला आहे’, असे हिंदूंना वाटते. त्यांच्याकडून परिवर्तनवादी पावले उचलली गेल्यास संत-महात्म्यांची भविष्यवाणी एक ना एक दिवस खरी ठरेल आणि हिंदूंच्या मनातील हिंदु राष्ट्र साकारले जाईल !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा !

बिहार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता ‘वन्दे मातरम्’ने होतांना राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सऊद आलम हे त्यांच्या जागेवर बसून होते. ते उभे राहिले नाहीत. याविषयी नंतर ते म्हणाले, ‘‘आपला देश हिंदु राष्ट्र नाही.’’

कृतज्ञताभावात राहिल्यास निराशा न येता मन आनंदी होऊन साधना अधिक चांगली करता येईल !

साधकांना साधनेत प्रगती करता येत नसली, स्वभावदोष आणि अहं यांच्यावर मात करता येत नसली, तर त्यांना ‘भावजागृतीसाठी प्रयत्न करा. भाव जागृत झाला की, साधनेतील बरेच अडथळे दूर होतील आणि प्रगती होईल’, असे सांगण्यात येते.

अनुभूती का येते ? याचे शास्त्र सांगणारे ज्ञान !

‘अनुभूती येणे हे सर्वस्वी साधकाच्या भावावर अवलंबून असते. जसा भाव, तशी अनुभूती. समोरच्या उन्नतांची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी साधकाचा भाव जेवढा असेल, त्या प्रमाणातच अनुभूतीचे मापन होते.’

गोपीभाव (गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव)

गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा आणि गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !

देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील !

अध्यात्मातील कृती करतांना भाव महत्त्वाचा असतो. प्रार्थना, नामजप यांच्यासह देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो.