प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सचिव अन् उपाध्यक्ष यांची भेट !

प्रवीण दरेकर आणि मी स्वत: नरहरी झिरवाळ अन् राजेंद्र भागवत यांची भेट घेऊन आसन व्यवस्थेच्या संदर्भात, तसेच आजारी आमदारांच्या वैद्यकीय व्यवस्थेविषयी चर्चा केली. उद्याच्या विश्वासदर्शक ठरावासाठी येथील सुरक्षा व्यवस्था चोख असावी, अशी मागणी केली.

समष्टी कार्याची तळमळ असलेले हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे आणि प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता येथे झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली.

आषाढी यात्रेसाठी मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेगाड्यांची सोय !

आजपासून एक्सप्रेस गाड्यांसाठी ‘जनरल तिकिटा’ची सोय उपलब्ध

मनसेच्या आमदाराने समर्थन देण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची चर्चा !

मनसेचा विधानसभेत १ आमदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात राज्यातील सत्ता स्थापनेविषयी भ्रमणभाषवर चर्चा झाली.

अडीच वर्षांपासून बंद असलेली पुणे-भुसावळ एक्सप्रेस १० जुलैपासून चालू होणार !

‘सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस’ सोलापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ६.३० वाजता पुण्याकडे रवाना होते. सकाळी १०.३० वाजता पुण्याला पोचते. त्यानंतर हीच गाडी भुसावळकडे पुणे-भुसावळ एक्सप्रेस म्हणून रवाना होईल.

खताचा साठा केल्यास दुकानदारांवर गुन्हे नोंद करा ! – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

असे जिल्हाधिकार्‍यांना का सांगावे लागते ?
स्वार्थासाठी खतांचा साठा करून शेतकर्‍यांची पिळवणूक करणारे व्यापारी समाजद्रोहीच !

सिडको गृहप्रकल्पातील अपघातात ४ कामगारांचा मृत्यू, २ जण घायाळ !

गृहप्रकल्पातील अपघातात ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर २ कामगार घायाळ झाले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी लोखंडी क्रेनचे मोठे सामान खाली पडले. त्यात चौघांचा मृत्यू झाला.

हिंदूंची वाढती हत्यासत्रे !

देशात हिंदूंची हत्यासत्रे वाढत आहेत. त्यामुळे यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दोषींना फासावर लटकावण्यासाठी प्रयत्न करावेत. असे झाले, तरच धर्मांधांवर वचक बसेल अन्यथा अशा असंख्य कन्हैयालालांना हकनाक जीव गमवावा लागेल !

सांगली महापालिकेकडून १ ते ५ जुलैअखेर वसंत व्याख्यानमाला !

ही व्याख्यानमाला प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता स्त्री सखी महिला मंडळ हॉल, विश्रामबाग येथे होणार आहे, तरी अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ठाणे येथे संरक्षक भिंत कोसळून एक जण घायाळ !

पडलेल्या भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. घायाळ झालेल्या अन्य व्यक्तींवर उपचार चालू आहेत.