अडीच वर्षांपासून बंद असलेली पुणे-भुसावळ एक्सप्रेस १० जुलैपासून चालू होणार !

पुणे-भुसावळ एक्सप्रेस’

सोलापूर – मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली ‘पुणे-भुसावळ एक्सप्रेस’ येत्या १० जुलैपासून चालू होणार आहे. त्यामुळे सोलापूरहून पनवेल आणि नाशिक येथे जाण्यासाठी प्रवाशांची सोय होणार आहे. ‘सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस’ सोलापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ६.३० वाजता पुण्याकडे रवाना होते. सकाळी १०.३० वाजता पुण्याला पोचते. त्यानंतर हीच गाडी भुसावळकडे पुणे-भुसावळ एक्सप्रेस म्हणून रवाना होईल. पुणे स्थानकावरून पुणे-भुसावळ एक्सप्रेस सकाळी ११.४० वाजता सुटेल. यानंतर पिंपरी-चिंचवड, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरीहून नाशिकला सायंकाळी ५.४७ वाजता पोचेल.

एक्सप्रेस म्हणून धावणार गदग पॅसेंजर !

कोरोना महामारीचा संसर्ग न्यून होताच रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोलापूर-गदग या दरम्यान धावणारी ‘सोलापूर-गदग पॅसेंजर’ चालू झाली; मात्र येत्या १५ जुलैपासून ती ‘एक्सप्रेस’ म्हणून धावणार आहे.