राजस्थानमधील उदयपूर येथे धर्मांध मुसलमानांनी शिवणकाम करणार्या कन्हैयालाल तेली या ४० वर्षीय हिंदूची आतंकवादी संघटना इसिसच्या पद्धतीने शिरच्छेद केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या प्रकरणात कन्हैयालाल यांच्या मुलाने शर्मा यांचे समर्थन करणारी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांत प्रसारित केली होती. त्याचा सूड जिहादी वृत्तीच्या लोकांनी कन्हैयालाल यांची हत्या करून उगवला.
वास्तविक कुठल्याही धर्मियाने कुणाच्याही धर्माचा किंवा श्रद्धास्थानांचा अवमान करू नये. केलाच, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी; पण मुळात अडचण येथेच आहे. हिंदूंच्या देवतांचा अवमान झाल्यावर तो अवमान करणार्याचे ते व्यक्तीस्वातंत्र्य असते आणि या अवमानाला वैध मार्गाने विरोध करणारे हिंदु तालिबानी असतात. याउलट मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर तो अक्षम्य गुन्हा असतो आणि तो करणार्याचा सूड त्याची हत्या करून उगवला जातो, असे आजवरचे चित्र आहे. नूपुर शर्मा यांच्याविरुद्ध मुंबई, भाग्यनगर अशा काही ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत; म्हणजे या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे त्या दोषी आहेत कि नाही ? हे चौकशीअंती समोर येईल. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. हे लोकशाहीने घालून दिलेले मार्ग लाथाडून हाती शस्त्र घेऊन हिंदूंचे गळे चिरायचे, ही कुठली पद्धत ? आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या विरोधात कुणीच काही बोलत नाही. एरव्ही हिंदूंना असहिष्णु ठरवणारे गीतकार जावेद अख्तर, चित्रपट अभिनेता नसिरुद्दीन शहा, स्वरा भास्कर आदी हिंदुद्वेष्टे या प्रकरणातही ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ ठेवून गप्प आहेत. त्यांना ही शिरच्छेदाची कृती सहिष्णु वाटते का ? काही वर्षांपूर्वी जमावाच्या मारहाणीत अखलाक नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसी, डावे, पुरोगामी आदींनी हिंदूंना आतंकवादी ठरवत देश डोक्यावर घेतला होता. तीही सर्व मंडळी आता गप्प आहेत.
‘शिर धडापासून वेगळे’ घोषणा सत्यात उतरली !
काही वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेट अर्थात् इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने इराक आणि सीरिया येथे धुमाकूळ घातला होता. हे आतंकवादी मुसलमानेतरांची गळे चिरून अशाच प्रकारे हत्या करत होते. ते भारतातही शिरकाव करण्याच्या प्रयत्नात होते. कन्हैयालाल यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, ती पहाता आतंकवादी इसिसने भारतात शिरकाव केल्याचे दिसून येते. नूपुर शर्मा प्रकरणात खरेतर असा शिरच्छेद करण्यात येणार असल्याची एक प्रकारे कल्पना काही दिवसांपूर्वी मारेकर्यांच्या धर्मबांधवांनी दिली होती, असे म्हणावे लागेल. त्यांनी ‘शिर धडापासून वेगळे’ (सर तन से जुदा) अशी चिथावणीखोर घोषणा दिली होती; मात्र त्यांच्यावर वेळीच काहीही ठोस कारवाई न केल्यामुळे या घोषणा कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदाच्या रूपाने सत्यात उतरल्या. राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘आम्ही दोषींवर कारवाई करू’ वगैरे शासकीय ठोकळेबाज उत्तरे देण्यापलीकडे काहीही केले नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनीही या हत्येचा शाब्दिक निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्याचा सोपस्कार पूर्ण केला. तथापि हिंदूंना आरोपी केल्या गेलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत याच गांधी आणि केजरीवाल यांनी निषेध करतांना जाणूनबुजून ‘हिंदु’ असा उल्लेख करून निषेध केला होता. २२ मार्च २०१९ या दिवशी केलेल्या एका ट्वीटमध्ये केजरीवाल यांनी ‘भगवद्गीता, रामायण, हनुमान चालिसा अशा कुठल्या ग्रंथात लिहिले आहे की, मुसलमानांना मारा ? हे लोक (मारणारे) हिंदु नाहीत, ते हिंदूंच्या वेशातील गुंड आहेत…’ अशा आशयाचे लिखाण केले होते. यासह राहुल गांधी यांनी २८ ऑक्टोबर २०२१ या दिवशी केलेल्या एका ट्वीटमध्ये ‘त्रिपुरात आमच्या मुसलमान बांधवांशी क्रूरतेने वागले जात आहे. हिंदूंच्या नावाने द्वेष आणि हिंसा करणारे हिंदु नव्हे, तर ढोंगी आहेत’, असे लिहिले होते. आता कन्हैयालाल प्रकरणात मात्र मुसलमान, इस्लाम, गुंड आदी शब्दांचा त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. इतर अनेक राजकारण्यांसह प्रसारमाध्यमांनीही ‘शांतता राखा’, असे आवाहन केले आहे; म्हणजे जणू हिंदू अशांतता पसरवत आहेत. थोडक्यात या हिंदूबहुल देशात मुसलमानांनी हिंदूंची हत्या करायची, हिंदूंच्या मुली पळवायच्या, हिंदूंच्या भूमी बळकावायच्या, असे वाटेल ते करायचे आणि हिंदूंनी मात्र हे सर्व शांतपणे सहन करायचे, असा ढोंगी अन् एकतर्फी धर्मनिरपेक्षतावाद हिंदूंवर थोपवला जात आहे. धर्माच्या नावाखाली कन्हैयालालच नव्हे, तर अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा जिहाद्यांच्या हिंसक प्रतिक्रियांविषयी कुणी काही बोलणार आहे कि नाही ?
तक्रार करूनही पोलीस संरक्षण नाही ?
शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ केल्यापासून कन्हैयालाल यांना मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. याविषयी त्यांनी पोलिसांत तक्रारही प्रविष्ट केली होती. मग प्रश्न असा पडतो की, कन्हैयालाल यांनी तक्रार करूनही पोलिसांनी त्यांना संरक्षण का पुरवले नाही ? यास कोण उत्तरदायी आहे ? आदींचीही चौकशी झाली पाहिजे आणि सत्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे.
एकूणच ज्यांना काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट खोटा वाटत होता, त्यांनी ‘उदयपूर फाइल्स’ बघितला पाहिजे. देशात हिंदूंची हत्यासत्रे वाढत आहेत. त्यामुळे यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दोषींना फासावर लटकावण्यासाठी प्रयत्न करावेत. असे झाले, तरच धर्मांधांवर वचक बसेल अन्यथा अशा असंख्य कन्हैयालालांना हकनाक जीव गमवावा लागेल.
हिंदूंची वाढती हत्यासत्रे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची अपरिहार्यता आतातरी लक्षात यावी ! |