समष्टी कार्याची तळमळ असलेले हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

फोंडा (गोवा), २९ जून (वार्ता.) – उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे आणि प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता येथे झालेल्या एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ही आनंदवार्ता घोषित केल्यानंतर उपस्थित सर्व सद्गुरु, संत आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक भावविभोर झाले. गुरुकृपायोगानुसार साधना करून पू. नीलेश सिंगबाळ यांनी सद्गुरुपद प्राप्त केले. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या पत्नी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान केला. या वेळी त्यांचे पुत्र श्री. सोहम् सिंगबाळ हेही उपस्थित होते.

(या सोहळ्याचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)