सिडको गृहप्रकल्पातील अपघातात ४ कामगारांचा मृत्यू, २ जण घायाळ !

सिडको गृहप्रकल्पातील अपघातात ४ कामगारांचा मृत्यू, २ जण घायाळ

नवी मुंबई – तळोजा फेज – २ येथे सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्पासाठी शिर्के कंस्ट्रक्शन हे आस्थापन ठेकेदार आहे. या गृहप्रकल्पातील अपघातात ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर २ कामगार घायाळ झाले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी लोखंडी क्रेनचे मोठे सामान खाली पडले. त्यात चौघांचा मृत्यू झाला.