ठाणे येथे संरक्षक भिंत कोसळून एक जण घायाळ !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, २९ जून (वार्ता.) – येथील पाचपखाडी भागातील अहिरे चाळीची अंदाजे ३० फूट लांबी आणि ५ फूट उंची असलेली सुरक्षा भिंत चारचाकी वाहनावर पडली. २८ जूनच्या रात्री १० वाजताच्या सुमारास ही घडली. या घटनेत भगवान मस्के (वय ५२ वर्षे) यांच्या पायाला दुखापत झाली आहे. पडलेल्या भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. घायाळ झालेल्या अन्य व्यक्तींवर उपचार चालू आहेत.