पुणे येथील भवानी पेठेत एका धर्मांधाच्या घरी स्फोट !

भवानी पेठ येथील विशाल सोसायटीमधील रशिद शेख याच्या फ्लॅटमध्ये स्फोट

पुणे – भवानी पेठ येथील विशाल सोसायटीमधील रशिद शेख याच्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला असून पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट धुलाई यंत्र दुरुस्त करतांना झाल्याचे समजते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता एवढी होती की, संबंधित व्यक्तीच्या घराच्या काचा फुटल्या आणि पूर्ण इमारतीमध्ये स्फोटाचा धक्का जाणवला. त्याच्या घराचे अन्वेषण केले असता त्याच्याकडे २ लॅपटॉप, १३ सिमकार्ड, ४ पासपोर्ट मिळाले. १३ सिमकार्ड पैकी एक हे ‘यूएई’चे आहे. संबंधित व्यक्ती हा ‘यूएई’ आणि इराण येथे जाऊन आला आहे, अशी माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पुणे सायबर पोलीस, ए.टी.एस्. अधिकारी, फॉरेन्सीक विभागाचे अधिकारी अन्वेषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या २ दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेमुळे संशयित व्यक्तीची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

शेख हा मुळचा मुंबई येथील असून तो इलेक्ट्रीशियन आहे. १० वर्षांपासून या सोसायटीत एकटाच रहात आहे. तो प्रतिदिन दुपारी १२ वाजता येऊन संध्याकाळपर्यंत येथे थांबत असे. त्यानंतर तो त्याच्या बहिणीकडे जायचा, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी दिली आहे. शेख हा येथील कोंढवा परिसरामध्ये नातेवाइकांसह ‘लिशा एनक्लेव्ह’ या उच्चभ्रू सोसायटीमध्ये रहात आहे. या सोसायटीमध्ये रहाणारा रशिद शेख हा खरंच इलेक्ट्र्रिक वस्तू दुरुस्त करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असेल का ? असा प्रश्न स्फोटाच्या घटनेतून उपस्थित होत आहे.

संपादकीय भूमिका

देशाचे पंतप्रधान शहरात येण्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटना उघडकीस येणे, हा आतंकवाद भारतातून समूळ नष्ट करत नसल्याचा परिणाम !