नूपुर शर्मा यांना भिवंडी पोलिसांनी समन्स बजावल्याचे प्रकरण
ठाणे, १३ जून (वार्ता.) – पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी नूपुर शर्मा यांना भिवंडी पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांना १३ जून या दिवशी पोलीस ठाण्यात जबाबासाठी उपस्थित रहावे लागणार होते. यावर नूपुर शर्मा यांनी पोलिसांकडे आणखी ४ आठवड्यांची मुदत मागितली आहे. १२ जूनच्या रात्री उशिरा नूपुर शर्मा यांनी अधिवक्त्यांच्या माध्यमातून भिवंडी पोलिसांकडे ई-मेलद्वारे मुदत मागितली आहे.
नूपुर शर्मा यांना पाठिंबा देणार्या अन्सारी यांना अटक !
नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ करणार्या साद अन्सारी यांना भिवंडी पोलिसांनी अटक केली. साद यांच्या ‘पोस्ट’नंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. संतप्त जमाव साद यांच्या घराबाहेर जमला होता. साद यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.