राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा ! – नाना पटोले

शरद पवार आणि नाना पटोले

मुंबई – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा असणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. १८ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी रणनीती ठरवण्यासाठी मोदी सरकारच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची १५ जून या दिवशी देहली येथे बैठक आयोजित केली आहे.