मणीपूर येथे स्फोटात १ ठार

इंफाळ (मणीपूर) – थौबल जिल्ह्यातील एका कम्युनिटी हॉलमध्ये आय.ई.डी.च्या झालेल्या एका स्फोटात १ कामगार ठार झाला, तर ४ जण घायाळ झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व जण मूळचे बंगालचे रहिवासी होते. हे कामगार या सभागृहामध्ये झोपले असतांना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.