केरळमध्ये हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या घोषणा देणाऱ्या १० वर्षीय मुसलमान मुलाच्या वडिलांना अटक

पी.एफ.आय.च्या मोर्च्याच्या वेळी दिल्या होत्या घोषणा

अटक करण्यात आलेला पी.एफ.आय.चा कार्यकर्ता अस्कर मुतफर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – काही दिवसांपूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका मोर्च्यामध्ये १० वर्षीय मुसलमान मुलाने हिंदूंचा वंशविच्छेद करण्याच्या संदर्भात चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर त्याचे वडील आणि पी.एफ.आय.चा कार्यकर्ता अस्कर मुतफर हा बेपत्ता झाला होता. या मोर्च्यामध्ये दिलेल्या हिंदुविरोधी घोषणेनंतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यानंतर पोलिसांनी हिंदुविरोधी घोषणा देणाऱ्या मुलाच्या वडिलांचा शोध घेतला. बेपत्ता झालेला मुतफर घरी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेच्या वेळी पी.एफ.आय.च्या कार्यकर्त्यांनी मुतफर रहात असलेल्या परिसरात एकत्र जमून प्रशासन आणि पोलीस यांच्या विरोधात घोषणा दिल्या. स्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर मुतफर याला काही काळ पालूरूथी पोलिसांकडे सोपवण्यात आले. त्यानंतर त्याला अल्लप्पुझा पोलिसांकडे सोपवण्यात आले. मुतफर हा कसाई आहे.