आज संभाजीनगर येथील ३ वसाहतींतील ८०० अवैध नळजोडण्या तोडणार !

प्रशासनाने अवैध नळजोडण्यांमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, हेही शोधावे.

धर्मांतरविरोधी कायदा हवाच !

धर्मांतर रोखण्यासाठी प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांचा मार खाणे, कारागृहात जाणे अशा दिव्यांना सामोरे जावे लागते. तरीही धर्मांतर रोखण्याचे कार्य ते इमानेइतबारे करतात.

ठाणे जिल्ह्यात वाळू माफियांचे ३० ते ५० लाख रुपयांचे साहित्य नष्ट !

मागील काही मासांपासून वाळूमाफियांकडून नदी आणि खाडीतून जाणार्‍या रेल्वे पुलांच्या तळाशी वाळू उपसा चालू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

दादर स्थानकातील रेल्वेरुळांवर नियमित फेकल्या जातात प्लास्टिकच्या शेकडो बाटल्या !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

हिंगोली येथे छेडछाडीस कंटाळून विष घेतल्याने मुलीचा मृत्यू !

सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथे छेडछाडीला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध प्यायलेल्या अल्पवयीन मुलीचा येथे उपचार चालू असतांना मृत्यू झाला.

शिरस्त्राण सक्ती ?

जनतेची मनमानी आणि शासनकर्त्यांची कचखाऊ वृत्ती हीच खरी देशाच्या विकासात खर्‍या अर्थी अडथळा आहे. हे देशासाठी चिंताजनक आणि दुर्दैवी आहे.

अशा कायदाद्रोही संघटनांवर बंदी घाला !

जमीयत उलमा-ए-हिंदच्या अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या विरोधात ठराव सादर करण्यात आला. तसेच ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये कोणताही पालट स्वीकारला जाणार नाही, याचा विरोध केला जाईल. शरीयतमध्ये हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही’, असेही सांगण्यात आले.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

‘हे भगवंता, माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट व्हावे आणि जर माझ्या समवेत अनिष्ट शक्ती आल्या असतील, तर त्या या वास्तूमधून निघून जाव्यात अन् माझी अंतर्बाह्य शुद्धी व्हावी.’, अशी प्रार्थना करुन घरात प्रवेश करावा.

हिंदूंना अल्पसंख्यांक करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती मिशनरी करत आहेत ! – इस्टर धनराज, अध्ययनकर्त्या, ख्रिश्चन स्टडीज्, तेलंगाणा

भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून ते आतापर्यंत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी स्थापन केलेल्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणे, हे एकच लक्ष्य राहिले आहे.