संपादकीय
हिंदुविरोधकांनी कितीही विरोध केला, तरी हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळणार हे निश्चित !
‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे २ दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन उत्तरप्रदेश येथे पार पडले. यात अध्यक्षीय भाषणात नेहमीप्रमाणे हिंदुविरोधी भूमिका घेत जमियतचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी, ‘आम्हाला आमच्याच देशात परकीय-अनोळखी बनवण्यात आले आहे. देशातील मुसलमान समाज आज अत्यंत विचित्र अवस्थेत जगत आहे. ज्या पद्धतीने सारे चालू आहे ते पहाता मुसलमानांना कारागृहात जाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. देशातील सध्याचे वातावरण आणि सरकारचे मौन दु:खद असून फाळणी सदृश वातावरण संपवावे लागेल’, अशी आगपाखड केली. वर्ष २०१४ पूर्वीचे अल्पसंख्यांकांच्या केंद्रस्थानी असलेले राजकारण आता बहुसंख्यांकांच्या केंद्रस्थानी आले आहे. वास्तविक मुसलमानांना परकीय-अनोळखी बनवण्यात येत नाही, तर हिंदू जागृत होत आजपर्यंत जाणीवपूर्वक लपवल्या गेलेल्या अनेक सत्यघटना समोर येत आहेत. ही खरी पोटदुखी जमियतसाख्या कट्टरता जोपासणार्या मुसलमान संघटनांची आहे आणि त्यातूनच मुसलमानांवर अन्याय होत असल्याचा कांगावा करण्यात येत आहे. वर्ष २००५ पासून अल्पसंख्यांकांसाठी १५ कलमी कार्यक्रमांच्या अंतर्गत मदरशांचे आधुनिकीकरण करणे, विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती, राज्य आणि केंद्र शासन यांच्या सेवांच्या भरतीसाठी पोलिसांसाठी विशेष विनामूल्य भरतीपूर्व प्रशिक्षण, रेल्वे, राष्ट्रीयकृत अधिकोषांत त्यांना काम मिळण्यासाठी विशेष प्रशिक्षण, शिक्षणासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा ज्यात केवळ ३ प्रतिशत व्याजदर, महिला बचत गटांना केवळ ५०० रुपयांत प्रशिक्षण, ते घेतांना सहा मास प्रतिमास २५० रुपये भत्ता आणि नंतर व्यवसाय चालू करण्यासाठी केवळ ४ टक्के दराने कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे. बहुसंख्य हिंदू या देशात जे प्रामाणिकपणे कर भरतात, त्यातूनच हा निधी देण्यात येत आहे आणि इतक्या सुविधा मिळूनही ‘देशातील मुसलमान विचित्र अवस्थेत जगत आहेत’, असे म्हणणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’च म्हणाव्या लागेल.
ताजमहाल, कुतूबमिनार, ज्ञानव्यापी मशीद यांसह देशातील बहुतांश सर्वच इस्लामिक वास्तू या हिंदूंची मंदिरे पाडूनच बांधण्यात आल्या आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण झाल्यास ती हिंदूंची मंदिरेच आहेत, हेच पुढे येईल; मात्र तसे सिद्ध होण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा हा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’चा आहे. या संदर्भात एकूण ७ याचिका सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट झाल्या आहेत. भविष्यात हा कायदाच रहित झाल्यास जवळपास देशातील सर्वच मशिदी, मदरसे यांच्यावरील अधिकार मुसलमानांना सोडावा लागेल. त्यामुळेच जमियतचा थयथयाट चालू आहे ! त्यामुळे मदनी यांच्यासारख्यांनी कितीही आदळआपट केली, तरी एक ना एक दिवस हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळणार, हे निश्चित आहे !